७. दिवाळी
७. दिवाळी
एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. आपण कशात रमून जातो?
उत्तर : आपण सण समारंभात रमून जातो.
२. हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण कोणता आहे ?
उत्तर : दिवाळी हा सण हिंदूचा सर्वात महत्त्वाचा सण आहे.
३. मुले कशात दंग असतात?
उत्तर : मुले फटाके उडवण्यात व खरेदी करण्यात दंग असतात
४. घरासमोर काय बांधले जातात?
उत्तर : घरासमोर किल्ले बांधले जातात.
५. मुलांना कशाची चिंता नसते?
उत्तर : मुलांना अभ्यास व परीक्षेची चिंता नसते
२. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
१. सण हे भारताच्या संस्कृतीचे ........ आहे. (द्योतक)
२. दिवाळी हा सण ........ दिवसाचा असतो. (पाच)
३. .......... सण म्हणजे दिवाळी. (दिव्यांचा)
४. .......... दिवाळीचा पहिला असतो. (धनत्रयोदशी)
५. .......... बहीण भावाला ओवाळते. (भाऊबीजेला)
चूक की बरोबर ते लिहा.
भारतात सण जल्लोषात साजरे केले जात नाही. - चूक
सण साजरे करताना उत्साहाचे वातावरण असते. - बरोबर
दिवाळी हा सण दहा दिवसांचा असतो. - चूक
दिवाळीत लक्ष्मीची पूजा करतात. - बरोबर
दिवाळीत मुले फटाके उडवतात. - बरोबर
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
१. आपल्या भारतात कोणकोणते सण साजरे केले जातात
उत्तर : आपल्या भारतात सर्व धर्माचे, प्रांताचे लोक असल्याने भारतात पोंगल, दिवाळी, गुढीपाडवा, होळी, दसरा, नाताळ, ओणम, ईद, पोळा इत्यादी सण साजरे केले जातात.
२. दिवाळी हा सण कसा साजरा केला जातो?
उत्तर : दिवाळी हा सण पाच दिवसां चा असतो. पाच दिवस घरापुढे कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास करतात. दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या दिवसात घरापुढे रांगोळ्या काढतात. घराला नवीन रंग देतात, नवीन कपडे घेतात. दागिने, वस्तू खरेदी करतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे फटाके खरेदी करण्यात आणि ते उडवण्यात दंग असतात. घरोघरी सगळ्या स्त्रिया फराळ करतात. मुले घरासमोर मातीचे छोटे-छोटे किल्ले बांधतात. घरात तयार केलेले लाडू, करंज्या, चिवडा, चकल्या, अनारसे खाण्यात लहान मुलांची चंगळ असते.
३. दिवाळी या सणाबद्दल कोणती कथा प्रचलित आहे?
उत्तर : प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारून सीतेसह अयोध्येत प्रवेश केला. अयोध्यावासियां नी दिव्यांची आरास करून अयोध्यानगरी सजवली व आनंद व्यक्त केला. अशी दिवाळी या सणाबद्दल कथा प्रचलित आहे.
वचन बदला.
पणती - पणत्या
दागिना - दागिने
दिवा - दिवे
चकल्या - चकली
कंदील - कंदील
करंजी - करंज्या
रांगोळी - रांगोळ्या
अनारसा - अनारसे
कपडा - कपडे
Comments
Post a Comment