5. शिक्षणाची आस : सर आयझॅक न्यूटन
5. शिक्षणाची आस : सर आयझॅक न्यूटन
ध्याय-Exercise
मौखिक (Oral)
1. न्यूटनचे पूर्ण नाव काय?
Ans. सर आयझॅक न्यूटन.
२. वारा कसा वाहत होता
Ans. मंद गतीने
३ रात्री आकाशात तुम्ही काय काय पाहिले आहे?
Ans. चंद्र, तारे
लेखी
प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
१. मुलाचे .......... सुरूच होते. ( निरीक्षण)
२. .......... वारा वाहू लागला. (मंद)
३. सगळ्यांच्या नजरा आभाळाकडे ......... (वळल्या)
४. न्यूटनला हवी तशी ............ तयार झाली (दुर्बीण)
प्र.२. एका वाक्यात्त उत्तरे लिहा.
1.आकाशात वेगाने पुढे काय सरकत होते?
Ans. झुपकेदार शेपटी सारखी तेजस्वी वस्तू आकाशात वेगाने पुढे सरकत होती.
2.मुलांचा आवडता छंद कोणता?
Ans. त-हेत-हेचे पतंग तयार करून आभाळात उडविणे हा मुलांचा छंद होता.
३. दुर्बिणीमुळे काय सुलभ झाले?
Ans. दुर्बिणीमुळे आकाशातील ग्रहमंडलाचे निरीक्षण करणे सुलभ झाले
४. मुले घरात का पळाली?
Ans. वादळ सुरू झाल्यामुळे मुले घरात पळाली.
प्र.३. थोडक्यात उत्तरे लिहा.
१. दूरवर उभा असलेला मुलगा गालातल्या गालात का हसत होता?
Ans. मुलाने लोकांची गंमत केली होती. तो एकदम ओरडला होता, "ते बघा, शेपटीच्या आकाराचं काही तरी आभाळात चमकतंय" आणि यावर विश्वास ठेवून जाणारे-येणारे थबकून वर पाहत होते. एवढेच नव्हे तर "धूमकेतू, धूमकेतू! म्हणून एकजण ओरडला तर "किती तेजस्वी दिसतोय आणि धावतोय बघा कसा वेगानं!" त्यांच्यापैकी एक तरुण म्हणाला. ही लोकांची गंमत पाहून दूरवर उभा असलेला मुलगा गालातल्या गालात हसत होता
२. न्यूटनने दुर्बीण कशी तयार केली?
Ans. न्यूटनने निरनिराळे आरसे व भिंगे ठराविक कोनात बसवून त्याला हवी तशी दर्बीण तयार केली
३. न्यूटन यांनी रोजच्या जीवनातील कोण-कोणत्या प्रसंगांचे निरीक्षण बारकाईने केले?
Ans. लाकडाचे ओंडके उतारावर घरंगळत जाणे, बंदुकीतून गोळी सुटली की दस्ता मागे खेचला जाणे, हलक्या हातोडीपेक्षा जड हातोडीने खिळा भिंतीत ठोकल्यास तो अधिक लवकर जाणे, होडीतून उडी मारली की होडी उलट दिशेने जाणे, इत्यादी रोजच्या जीवनातील प्रसंगां चे निरीक्षण न्यूटननेबारकाईने केले. त्यातूनच त्याचे गतिविषयक नियम जगासमोर आले.
प्र.४. खालील वाक्यात विरामचिन्हे योजा आणि वाक्ये पुन्हा लिहा.
१. कुठं काय इतरांनी विचारले
Ans. 'कुठं काय?' इतरांनी विचारले.
२. कशी गंमत केली
Ans. कशी गंमत केली.
प्र.५. चूक की बरोबर ते लिहा.
१. न्यूटन आजीजवळ राहत होता. - बरोबर
२.न्यूटनला गणित आवडत नव्हते. - चूक
३. न्यूटनला पतंग उडवणे आवडत असे. - बरोबर
४. न्यूटनने दुर्बिणीचा शोध लावला. - चूक
५. न्यूटनने गतिविषयक नियम मांडला. - बरोबर
प्र.६. विरुद्धार्थी शब्द लिहा.
अंधार X उजेड
मोठे X छोटे
बाहेर X आत
भरती X ओहोटी
वेगाने X मंद
अस्पष्ट x स्पष्ट
दिवस X रात्र
यश X अपयश
प्र.७. वचन बदला.
घरटे - घरटी
पावले - पाऊल
पतंग - पतंग
कागद - कागद
मेणबत्ती - मेणबत्त्या
खिळा - खिळे
ओंडका - ओंडके
उडी - उड्या
प्र.८. लिंग बदला.
तरुण - तरुणी
मुलगा - मुलगी
वृद्ध - वृद्धा
Comments
Post a Comment